हे पुस्तक एका बैठकीत वाचून संपवण्यासारखं नाही. ‘ऑर्वेलियन’ मते आपल्याला विचार करायला भाग पाडतात...
ऑर्वेलच्या ‘भडक रंग राष्ट्रवादाचे’ या लेखातले ‘राष्ट्रवाद’ आणि ‘देशभक्ती’वरील विचार मार्मिक आहेत. आपल्या विद्यमान सामाजिक, राजकीय पार्श्वभूमीवर हे विचार अंतर्मुख करतात. तो लिहितो, ‘‘राष्ट्रवादाचे पहिले गृहितक असते, माणसांचे किटकांप्रमाणे वर्गीकरण केले जाऊ शकते आणि लाखो करोडो व्यक्तींना एकगठ्ठा चांगले अथवा वाईट अशी लेबले लावली जाऊ शकतात.’’.......